उंड्रीत महाशिवरात्र उत्सहात साजरी ; राज्याला कोरोना मुक्त करण्याचे राजेंद्र भिंताडे यांचे साकडे

367

अनिल चौधरी, पुणे

उंड्री गावातील गेली १०० ते १२५ वर्षे जुने प्राचीन असे प्रसिद्ध महादेव मंदिरामध्ये गावातील स्थानिक लोकांच्या हस्ते श्री महादेव मंदिरात प्रसिद्ध युवा उद्योजक राजेंद्र भिंताडे तसेच इतर नागरिकांच्या वतीने महारुद्र अभिषेक, होम हवन आणि महामृत्युंजय जप धार्मिक यज्ञ करून महाशिवरात्र उत्सहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मोजक्याच लोकांच्या हस्ते  धार्मिक विधी करून मंदिर दर्शनासाठी उपलब्ध केले. यावेळी उद्योजक राजेंद्र भिंताडे यांनी राज्याला कोरोना मुक्त करण्याचे साकडे श्री.शंभू महादेवाला केले..

 मंदिरांसमोरचा परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. मंदिरावर विद्युत रोषणाईही करण्यात आली होती.  हे मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे.  या मंदिरात दर्शन घेण्यासाठी लोक दूरदूरवरून येतात. नवसाला पावणारे असे हे महादेव मंदिर असल्याची आख्यायिका असल्याची माहिती भिंताडे यांनी यावेळी दिली. तसेच अनेक लोकांना याची प्रचिती देखील आली आहे असे ते यावेळी म्हणाले.  
    याप्रसंगी राजेंद्र भिंताडे, शशिकांत पुणेकर, दत्तात्रय कामठे, जालिंदर कामठे, सचिन पुणेकर, गणेश कानडे,काशिनाथ पुणेकर, प्रफूल कदम, जयश्री पुणेकर, मायाताई कामठे, ललिता कामठे, रेणुका भिंताडे, ज्योती पुणेकर आदी उपस्थित होते.