उंड्रीत अद्यायावत कोविड सेंटरसाठी राजेंद्र भिंताडे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

428

कोंढवा प्रतिनिधी

उंड्री -पिसोळी तसेच १२ वाड्यांसाठी ऑक्सिजन व्हेंटिलेटर सह १०० बेड्सचे अद्यायावत असे हॉस्पिटल अथवा कोविड सेंटर चालू करण्यासाठी जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले.
सध्या पुणे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.उंड्री -पिसोळी तसेच १२ वाड्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे.तसेच वेळेवर उपचार अथवा हॉस्पिटल न मिळाल्याने अनेक नागरिकांचे मृत्यू देखील होत आहे. उंड्री पिसोळी तसेच १२ वाड्यांमध्ये एकही आरोग्य केंद्र नाही त्यामुळे येथील नागरिकांना कोंढवा तसेच पुणे शहरात हॉस्पिटल साठी वणवण फिरावे लागत आहे, तरीही कुठेच बेड मिळत नाही आणि मिळालाच तरीही फार उशीर झालेला असतो. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो. अशा वेळो उंड्री मध्ये सुसज्ज असे ऑक्सिजन – व्हेंटिलेटर सह १०० बेड्स चे हॉस्पिटल अथवा कोविड सेंटर चालू केल्यास या परिसरातील नागरिक येथेच उपचार करतील व शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. याचाच विचार करून जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना या परिसरासाठी कोविड सेंटर चालू करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोविड सेंटर चालू करण्याबाबत सकारत्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी राजेंद्र भिंताडे अविनाश टकले,दादा कड, ओंकार होले आदी उपस्थित होते.