भारत रत्न लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरांच्या कार्यावर आधारित भक्तिगीतांचा अल्बमचे प्रकाशन

403

पुणे प्रतिनिधी,

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान कवी, तत्वज्ञ तसेच संत म्हणून ओळखले जातात. भागवत धर्माचा तसेच वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी त्यांच्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘भावार्थ दीपिका’ यांसारखे अनेक अभंग व विरहिणी (भक्तीगीते व कविता) लिहिले.

पन्नास वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी सारेगामा ह्या भारतातील सर्वात मोठ्या संगीत संस्थेसोबत एकत्रित ‘ज्ञानेश्वर माऊली’ हा भक्तिगीतांचा अल्बम प्रदर्शित केला होता. या अल्बममध्येही संत ज्ञानेश्वर यांच्या कविता व अभंगांवर आधारित गीतांना लता मंगेशकर यांचा आवाज लाभला होता. ‘भावार्थ माऊली’ या नव्या भक्तीगीतांच्या अल्बमला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. दहा महत्त्वाच्या मराठी रचनांचा आध्यामिक काव्यप्रेमींना पुन्हा परिचय करून देण्यात आला आहे. प्रत्येक गाण्याचा खरा अर्थ सांगणारे एक भाष्यही यात सादर केले गेले आहे.

महान संत ज्ञानेश्वरांचे काव्यात्मक साहित्य आजच्या पिढीसमोर सादर करण्याचा मला सन्मान मिळाला. ‘भावार्थ माऊली’ या अल्बमच्या माध्यमातून मी व माझ्या भावाने, हृदयनाथने प्रत्येक कवितेतील अध्यात्माचे सार उलगडत प्रत्येक गाण्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की, ही सुंदर गाणी ऐकताना प्रेक्षकांना अध्यात्माची अनुभूती मिळेल.” असे लता मंगेशकर यांनी गाण्याच्या प्रदर्शनावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत व लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेला हा अल्बम आज सारेगामाच्या युट्युब वाहिनीवर व इतर संगीतवाहिनीवर प्रदर्शित झाला आहे.