कोंढवा प्रतिनिधी
वाढत्या कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरण महत्वाचे आहे. आज जगातील इस्राईल हा देश संपूर्ण लसीकरण केल्यामुळे कोरोनामुक्त आणि मास मुक्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहीम जोरदार सुरुवात करण्यास सांगितले. त्यामुळे उंड्रीतील जिल्हापरिषद शाळेमध्ये आज लसीकरण मोहीम सुरु करून त्याचे उद्घाटन जिल्हापरिषदेचे मा.अध्यक्ष जालिंदर कामठे , नगरसेविका अश्विनी पोकळे, वृषाली कामठे, जनसेवक राजेंद्र भिंताडे, स्न्हेहल दगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उंड्री आणि परिसरात नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी हा भाग ग्रामीण असल्यामुळे येथे आरोग्य केंद्र नाही. पण आता पालिकेमध्ये समावेश होऊन देखील येथे आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे जनसेवक राजेंद्र भिंताडे व नगरसेविका पोकळे यांनी प्रशासनाच्या मोठा पाठपुरावा करून या भागामध्ये लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यामुळे येथील बारा वाड्या आणि उंड्री -पिसोळी भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून लसीकरणासाठी इतरत्र जाण्याची गरज नसल्याचे भिंताडे यांनी सांगितले. तर या भागात मोठे सुसज्ज असे हॉस्पिटल येथे पुणे मनपाच्या माध्यमातून उभे करण्याचा मानस असल्याचे नगरसेविका अश्विनी पोकळे आणि राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले. याप्रसंगी अविनाश टकले, सुभाष टकले, दादा कड, ओंकार होले, स्वाती टकले , ऍडव्होकेट जाधव, धनंजय कामठे, सचिन हांडे, प्रसाद होले , विजय कड, विजय चौधरी, राहुल भिंताडे, प्रफुल कदम, डॉ. तेजस्विनी अरविंद, जयश्री पुणेकर, गौरी फुलावरे आदी उपस्थित होते .