रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ : राजेंद्र भिंताडे

768

कोंढवा प्रतिनिधी

मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍या मानवाचे प्राण वाचवु शकतात. यामुळे रक्ताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. यामुळेच रक्तदान हेच जीवनदान आणि सर्वश्रेष्ठ दान आहे , असे मत राजेंद्र भिंताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आपले मनोगत व्यक्त करताना केले. तर वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा संकल्प करत असल्याची घोषणा देखील यावेळी व्यक्त केली.

वाढत्या कोरोना रुग्नांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रक्त पेढीतील रकताचा साठा मर्यादित असल्याने शासनाने रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरासाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि रुबी हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले होते तर तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शिबिरास उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबीर यशस्वी केल्याबद्दल दादा कड, अविनाश टकले यांनी नागरिकांचे आभार मानले आहे. याप्रसंगी फ्रंटलाईन वर्कर महापालिकेच्या सफाई कामगार यांना मास्क, सॅनिटायजर , वाफेचे मशीन देण्यात आली तसेच पोलीस बांधवांस देखील मास्क, सॅनिटायझर, वाफेचे मशीन देण्यात आली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योगगुरू श्री दीपक महाराज, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, भाजपा नेते जालिंदर कामठे, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेविका अश्विनी पोकळे, नगरसेविका रुपाली धाडवे, डॉ.अरविंद तेजस्विनी, अर्चना शहा, धनंजय कामठे , सचिन हांडे, दादा कड, अविनाश टकले , ओंकार होले, सचिन पुणेकर, दत्तोबा होले, जालिंदर कामठे , , जयश्री पुणेकर, अक्षय फुलावरे, सुभाष घुले, विशाल कामठे, प्रतीक कड, राहुल भिंताडे, श्रीकांत भिंताडे, पप्पू कदम, कपिल आबनावे, दादा लोणकर, डॉ. विनायक मासाळ, संतोष गोरड, विजय टकले आदी उपस्थित होते.

रक्तदान हि आजच्या काळाची गरज असून , अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याचा घटना कानावर येत असतात. यामुळे जास्तीत जास्त तरुण मुलांनी रक्तदान करावे आपल्याच बंधू – भगिनींचे प्राण वाचवावे, तसेच या कोरोना महामारीच्या काळात रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. कोरोनातून बरे झालेल्या रुग्नांनी प्लाझ्मा दान करावे तसेच राजेंद्र भिंताडे यांच्या सारखा आर्दर्श सर्वानीच घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित करावेत असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर नगरसेविका नंदा लोणकर यांनी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करून एक जीव वाचवण्याचे आवाहन केले आहे.

राजेंद्र भिंताडे रक्तदान शिबिरात व्यस्त असताना तेथून नवीनच लग्न झालेले विवाहित झोडपे होते , भिंताडे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस करून नवविवाहितांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना भेटवस्तू देऊन पुढील वैवाहिक आयुष्यास शुभेच्छा देऊन भविष्यात काही मदत लागल्यास ती आपण सर्वपदी करू अशा विश्वास देखील त्यांना दिला. तसेच उंड्री चौकात रस्त्याचे साईड पट्टीचे काम व्यवस्थित न झाल्याने त्यांनी रस्त्याच्या ठेकेदारास त्वरित बोलावून ते काम स्वतः उपस्थित राहून व्यवस्थित करवून घेतले यामुळे वाहनचालकांनी आणि ग्रामस्थानी त्यांचे विशेष आभार देखील यावेळी मानले.