कोरोनाकाळात रुग्णांना ‘आरोग्य निर्भर पॅटर्न’ ठरतोय वरदान

380

_‘आरोग्य निर्भर थेरपी’ आणि ऑक्सिजनची मात्रा वाढवणारे ‘क्लोरोलाईफ’ या औषधांचे कोविड रुग्णांमध्ये आश्चर्यचकीत करणारे परिणाम._

बारामती (प्रतिनिधी): कोरोना महामारीच्या संकट काळात संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशच्या संशोधनावर आधारित ‘आरोग्य निर्भर’ इम्युनोथेरपी आपली परिणामकारकता सिद्ध करण्यात यशस्वी होत आहेत. गेली ३५ वर्षे आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे पुण्यातील डॉ. पी.एन. कदम यांच्या संशोधनातून तयार झालेल्या ‘आरोग्य निर्भर’ आणि ‘क्लोरोलाईफ’ या अन्न आणि औषध प्रशासन मान्यताप्राप्त उत्पादने कोरोना रुग्णांमधील लक्षणे गंभीर होण्यापासून रोखत असल्याचे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. बारामतीमधील अशोकनगर भागात सुरु असलेल्या ‘संकल्प आरोग्य निर्भर कोविड केअर हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत असलेले अनेक रुग्ण या थेरपीद्वारे उपचार घेऊन पूर्णपणे बरे होउन घरी गेले आहेत.

रुग्णांमधील कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी करणे, लक्षणे कमी होणे, ऑक्सिजन पातळीत वाढ होणे आणि आजाराची गुंतागुंत कमी करणे असे सकारात्मक परिणाम या औषधी आहाराच्या वापरातून दिसून आले असून ही थेरपी सुरु केल्यानंतर दोन ते तीन दिवसांतच त्याचे परिणाम दिसत आहेत. इम्युनोथेरपी देण्याआगोदर आणि दिल्यानंतर रुग्णाच्या शरीरातील विषाणूंचे प्रमाण (व्हायरल लोड) 24 ते 36 तासांत कमी होत आहेत. शासनाकडून देण्यात येणा-या निर्देशांचे तंतोतंत पालन करुन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काही ठराविक औंषधांच्या अतिवापरांमुळे होणारे दुष्परिणाम आणि शरिरावर होणारा घातक परिणाम टाळून उपचार घेणे शक्य असल्याचे संकल्प आरोग्य निर्भर हॉस्पिटल चे डॉ. कदम यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेवेळी संकल्पचे कार्यकारी संचालक डॉ. पी.एन. कदम, संचालिका डॉ. अपुर्वा अहिरराव, शर्वरी डोंबे, डॉ. नितीन मिसाळ, डॉ. शशिकांत भोसले, डॉ. सुहास लबडे, डॉ. इंद्रजीत भोसले, डॉ. गितांजली ठोंबरे, डॉ. अमोल चांदगुडे, आरोग्य निर्भर कोविड केअरचे प्रकल्प समन्वयक रघुवीर सिंग राठोड उपस्थित होते.