अनिल चौधरी, पुणे
डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. त्यांना जीवनदाताही म्हटलं जातं. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीत तर याची प्रचिती आली आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी फ्रण्ट लाईन योद्धा म्हणून लढत आहेत. प्रत्येक परिस्थितीत आपलं कर्तव्य निभावत रुग्णांना चांगले उपचार कसे मिळतील यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात. रुग्णसेवा आणि कामाप्रती समर्पित असलेल्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ समाजसेवक राजेंद्र भिंताडे यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील कोरोना विभागाच्या प्रमुख डॉ.अश्विनी जोशी आणि मंगेशकर हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजी विभागाच्या कॅन्सर विभागाच्या प्रमुख डॉ.सुजित जोशी यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उंड्री-पिसोळी येथील मासाळ हॉस्पिटलमधील डॉक्टर , परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचा फेटा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. तेजस्विनी अरविंद, डॉ.विनायक मासाळ, डॉ. प्रियंका मासाळ, डॉ.अश्विन खिलारे, डॉ.राजेश खूडे, हेमंत बालगुडे, रुपेश सोनावणे , डॉ. आनंद भालेराव, डॉ.रोहित बिरादार, डॉ.सचिन पाटील, डॉ अनिकेत कानडे, डॉ सुरेश चौधरी, डॉ.प्रज्ञा भालेराव, स्वाती जैन व साऊथ हवेली डॉक्टर्स असोसिएशन चे डॉक्टर ऍड. उर्मिला जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राजेंद्र भिंताडे म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो.आपल्या काळ्या आईची सेवा करीत कष्टाने अन्नधान्य पिकवितो. शेतीचे आरोग्य ज्याला चांगले कळते तोच शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. तसेच माणसाच्या आरोग्याची नाडी हाती लागली कि रोग्याचा आजार कमी होण्यास वेळ लागत नाही. मानवाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी डॉकटर व शेतकरी यांचे सारखेच महत्व असल्यामुळे एक जुलै हा कृषी व डॉकटर दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या दिड वर्षाच्या कोरोनाच्या काळात शेतकरी आणि डॉकटर किती महत्वाचे आहेत हे साऱ्या जगाने पाहिले आहे.आता शेतकरी कुटुंबात देखील शैक्षणिक जागृती निर्माण झाली आहे. आपापल्या पाल्याना उच्च शिक्षण देण्याचे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न आहे. असेही भिंताडे यावेळी म्हणाले. यावेळी प्रगतशील शेतकरी देवराम धावडे व काशीनाथ भिंताडे यांचा कृषी दिनानिमित्त सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्ती बांदल, दादा कड, अविनाश टकले, ओंकार होले विठ्ठल भिंताडे, तुषार भिंताडे, योगेश भिंताडे, श्रीकांत भिंताडे, सचिन भिंताडे व उंड्री पिसोळी ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र भिंताडे यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विन खिलारे यांनी केले तर आभार विनायक मासाळ यांनी मानले.