एकपात्री सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद.

378

आशिष ,पुणे-

सहारा प्रॉडक्शन हाऊस आणि मिडास टच इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने एकपात्री सादरीकरण अभिजित जोशी मेमोरियल फाऊन्डेशनच्या सभागृहात पार पडले. मार्च महिन्यात १३ ते ६५ या वयोगटामधे ऑनलाईन पद्धती ने ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या त्यामधून २५ सहभागींनी प्रत्यक्ष रित्या सादरीकरणा मधे भाग घेतला. लॉकडाऊन नंतर प्रथमच सगळे जण प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकल्या मुळे आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात सादरीकरण पार पडले. प्रत्येकी ५ ते ७ मिनटांचा कालावधी देण्यात आला होता. कोरोनात पतीची आणि परिवाराची काळजी घेणारी पत्नी, वऱ्हाड निघालंय लंडनला मधील रंजक पात्रं, ती फुलराणी, होम मिनीस्टर मधले आदेश भाऊजी घरी आल्यानंतर होणारी गंमत, सर्वधर्म समभाव या व अशा विविध विषयांवर आपली कला सादर केली. सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सहारा प्राँडक्शन हाऊस तर्फे निरनिराळ्या समाज प्रबोधन करणाऱ्या लघुपटांची निर्मिती केली जाणार असुन या स्पर्धकांना यातुन अभिनयाची संधी दिली जाणार असल्याचे सहारा चे संस्थापक डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

स्पर्धेचे परीक्षण चित्रपट नाट्य आणि मालिकांचे लेखक आणि दिग्दर्शक प्रदीप प्रभुणे यांनी केले. सर्व स्पर्धकांना चित्रपट व नाट्य दिग्दर्शक सुनिल नाईक यांनी स्पर्धेच्या दृष्टीने तसेच अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींची माहिती दिली. कार्यक्रमाला माजी पोलिस अधिक्षक डॉ. विठ्ठल जाधव प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील काही रंजक किस्से सांगितले तसेच त्यांनी स्थापन केलेल्या शांतीदूत परिवाराच्या कार्याची माहिती दिली. या प्रसंगी सहारा च्या रसिका भवाळकर, मिडास टच च्या डॉ. अंजली जोशी, वैशाली चिपलकट्टी, अभिजित जोशी मेमोरियल फाऊन्डेशन चे नीतू अरोरा आणि अथर्व जोशी उपस्थित होते.