माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांना अटक

680
पुणे प्रतिनिधी
विविध गुन्हे असणारे खडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बर्‍हाटे फरार होता. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. शहरातील विविध पोलिस ठाण्यात रवींद्र बर्‍हाटे याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

    रवींद्र बर्‍हाटे याच्याविरूध्द चतुःश्रृंगीसह पुणे  शहरातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काही दिवसांपुर्वीच त्याची पत्नी संगीता रवींद्र बर्‍हाटे यांना अटक केली होती. गुन्ह शाखेच्या पोलिसांनी त्यानंतर बर्‍हाटेच्या मुलाला देखील अटक केली. त्यानंतर पोलिसांनी बर्‍हाटेला मदत करणार्‍या सुनील मोरे याला देखील अटक केली. बर्‍हाटेसह बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, तथाकथित पत्रकार देवेंद्र जैन, सांगलीचे संजय भोकरे आणि इतरांविरूध्द गुन्हे आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे ,अप्पर आयुक्त अशोक मोराळे , उपायुक्त श्रीनिवास घाडगे , सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख , सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांच्या पथकाने रवींद्र बर्‍हाटेला अटक केली आहे.