राजस्‍थानी पोदार लर्न स्‍कूलकडून आधुनिक अध्‍यापन पद्धतीवर आधारित शिक्षणाचा अवलंब

179

किनेस्‍थेटिक कृतींचा वापर करत जीवन कौशल्‍य मॉड्युल्‍सच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांचे सक्षमीकरण
• २०१६ मध्‍ये पोदार एज्‍युकेशन नेटवर्ककडून फ्रँचायझी-बेस्‍ड मॉडेल सादर
• सीबीएसई/आयसीएसई शिक्षण वाढवण्‍याचा आणि भारताच्‍या अर्ध-शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये दर्जेदार शिक्षणाला चालना देण्‍याचा मनसुबा
• फ्रँचायझी मालकांना सर्वांगीण साह्य,संपूर्ण समुदायाला लाभ
१ जुलै २०२१: राजस्‍थानी पोदार लर्न स्‍कूल या पोदार एज्‍युकेशन नेटवर्कअंतर्गत (पीईएन) असलेल्‍या पोदार लर्न स्‍कूलच्‍या (पीएलएस) फ्रँचायझीने महाराष्‍ट्रातील ग्रामीण बीड येथील परळी वैजनाथ नगरच्‍या युवा विद्यार्थ्‍यांसाठी आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळण्‍याची सुविधा आणली आहे. पोदार एज्‍युकेशन नेटवर्कचे शालेय फ्रँचायझी मॉडेल अद्वितीय आहे आणि भारताच्‍या ग्रामीण व अर्ध-शहरी भागांमध्‍ये झपाट्याने यशस्‍वी बनत आहे.
भारताच्‍या नवीन शैक्षणिक धोरणाशी संलग्‍न असलेल्‍या पीएलएस मॉडेलचा भारतभरातील सीबीएसई/आयसीएसई शाळांचा दर्जा उंचावण्‍याचा आणि भारतातील अर्ध-शहरी व ग्रामीण भागांतील मुलांना दर्जेदार शालेय शिक्षण उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. २०१६ मध्‍ये सादर करण्‍यात आलेल्‍या पोदार एज्‍युकेशन नेटवर्कचे हे मॉडेल अद्वितीय आहे आणि झपाट्याने भारताच्‍या अर्ध-शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये यशस्‍वी होत आहे. या आधारावर राजस्‍थानी पोदार लर्न स्‍कूलची स्‍थापना २०१६ मध्‍ये करण्‍यात आली. सध्‍या या शाळेमध्‍ये ८५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
फ्रँचायझी मॉडेल, विद्यार्थी व फ्रँचायझी मालकांसाठी त्‍यांचा मनसुबा व लाभांबाबत सांगताना राजस्‍थानी पोदार लर्न स्‍कूलचे विश्‍वस्‍त श्री. धीरज बहेती म्‍हणाले, ”आमची परळी वैजनाथमध्‍ये जमिन होती आणि त्‍या जमिनीवर आमच्‍या नगराच्‍या मुलांसाठी शाळा सुरू करण्‍याची इच्‍छा होती. लहान शाळा सुरू करण्‍याऐवजी आम्‍ही पोदार लर्न स्‍कूल सारख्‍या मोठ्या ब्रॅण्‍डसोबत सहयोग करण्‍याचा विचार केला. महाराष्‍ट्रातील ग्रामीण बीडच्‍या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अध्‍यापन पद्धतींवर आधारित शिक्षण उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा होता. पोदार एज्‍युकेशन नेटवर्कसोबतच्‍या सहयोगाने आमच्‍या विचारसरणीला वाव देण्‍यासोबत मुलांच्‍या एकूण व्‍यक्तिमत्त्व विकासामध्‍ये मदत देखील केली आहे. आम्‍ही योग्‍य दिशेने वाटचाल करत आहोत.”
श्री. बहेती पुढे म्‍हणाले, ‘राजस्थानी पोदार लर्न स्‍कूलमध्‍ये आमची अध्‍यापन पद्धती पोदार एज्‍युकेशन नेटवर्कमधून अवलंबण्‍यात आली आहे. आम्‍ही तंत्रज्ञान व आधुनिक तंत्रांचा समावेश करण्‍यासाठी पारंपारिक फळा-खडू अध्‍यापन पद्धतींच्‍या मर्यादांपलीकडे जाण्‍याचा प्रयत्‍न करतो. अशा तंत्रज्ञानाच्‍या मदतीने आम्‍ही आमच्‍या विद्यार्थ्‍यांना विषयाचे सर्वांगीण ज्ञान देण्‍यासोबत तल्‍लख बुद्धीसह विचार करण्‍यास सक्षम करतो. जीवन कौशल्‍य मॉड्युल्‍सच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना जीवनातील समस्‍यांचा सामना करण्‍यास सक्षम करण्‍यासोबत त्‍यांच्‍यामध्‍ये सामाजिक व भावनिक कौशल्‍यांची निर्मिती केली जाते. पोदार लर्न स्‍कूलने दिलेली ही अध्‍यापन पद्धत सहयोगात्‍मक अध्‍ययन, पीअर पार्टनर अध्‍ययन आणि सांघिक अध्‍ययन अशा पद्धतींचा वापर करत किनेस्‍थेटिक कृतींचा अवलंब करून त्‍यांच्‍या दैनंदिन अभ्‍यासक्रमामध्‍ये वापरली जाते, पीएलएसच्‍या माध्‍यमातून आम्‍ही आमच्‍या विद्यार्थ्‍याना वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळामध्‍ये विविध प्रतिभा, सॉफ्ट स्किल्‍स व विचार करण्‍याची क्षमता विकसित होण्‍यासाठी शिक्षण देत आहोत. आम्‍हाला भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक फ्रँचायझी मॉडेल असण्‍याचा अभिमान वाटतो. आमचे विद्यार्थी व समुदायांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. आम्‍ही शिक्षणासाठी असलेल्‍या आमच्‍या पॅशनला प्रकाश झोतात आणले आणि पोदार एज्‍युकेशन नेटवर्कने (पीईएन) त्‍यामध्‍ये मदतीचा हात पुढे केला.”
पोदार एज्‍युकेशन नेटवर्कने राजस्‍थानी पोदार लर्न स्‍कूलला अभ्‍यासक्रम, शिक्षकांचे प्रशिक्षण, संसाधनांची यादी, शालेय व्‍यवस्‍थापन व कार्यसंचालन, आणखी एक पोदार इंटरनॅशनल स्‍कूल – पोदार स्‍कूलअंतर्गत मार्गदर्शन, आयटी सपोर्ट, परवानगी, परिवहन, युनिफॉर्म्‍स, पुस्‍तके, विपणन यांसह शाळा उभारण्‍यामध्‍ये सर्वांगीण मदत केली आहे. पीएलएस ही भारतभरात कार्यरत असलेली यंत्रणा आहे. राजस्‍थानी पीएलएसची पुस्‍तके, पाठ नियोजन, अभ्‍यासक्रम, परीक्षा व वेळापत्रक पुणे, बेंगळुरू किंवा मुंबई सारख्‍या काही मोठ्या शहरांमधील कोणत्‍याही पोदार इंटरनॅशनल स्‍कूलप्रमाणेच आहेत. ज्‍यामुळे राजस्‍थानी पीएलएस बीड जिल्‍ह्यामधील परळी वैजनाथ सारख्‍या लहान नगरामध्‍ये दर्जेदार शालेय शिक्षण आणण्‍यामध्‍ये यशस्‍वी झाली आहे. तंत्रज्ञान, इंग्रजी संभाषणाच्‍या माध्‍यमातून शिक्षण आणि विद्यार्थ्‍यांना सर्वांगीण जागतिक दर्जाचा नागरिक बनवण्‍यावर भर देण्‍यात आला आहे.
राजस्‍थानी पीएलएस परळी वैजनाथच्‍या समुदायांना अनेक लाभ देत आहे. शिक्षक, शालेय प्रशासन कर्मचारी, बस ड्रायव्‍हर्स, शालेय स्‍टेशनरी प्रदाता आणि इतर सहाय्यक व्‍यवसायांना रोजगार व कमावण्‍याची संधी देण्‍यासोबत राजस्थानी पीएलएस समुदायामध्‍ये उद्योजकता व आधुनिकता आणत आहे. आपल्‍या मुलांना मिळत असलेली कौशल्‍ये व मूल्‍यांमुळे पालकवर्ग आनंदी आहे. परळी वैजनाथच्‍या निवासींना कधीच विज्ञान प्रयोगशाळा व संगणक सुविधा मिळालेली नव्‍हती, पण राजस्‍थानी पीएलएसमुळे त्‍यांना ती सुविधा मिळत आहे.
श्री. बहेती म्‍हणाले, ”पोदार एज्‍युकेशन नेटवर्कचे पीएलएस फ्रँचायझी-मॉडेल हे प्रत्‍येकासाठी उत्तम संधी आहे. विद्यार्थी, पालक व समुदायासाठी हे दर्जेदार शिक्षण मिळण्‍याचे गंतव्‍य आहे. फ्रँचायझी मालकांसाठी ही आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होण्‍याची संधी आहे, ज्‍यामध्‍ये पोदार एज्‍युकेशन नेटवर्ककडून (पीईएन) शाळा उभारण्‍यासोबत कार्यसंचालनासाठी संपूर्ण मदत केली जाते. या मॉडेलसोबत आरपीएलएसचा अनुभव अद्भुत राहिला आहे. आम्‍हाला ८५० विद्यार्थ्‍यांची अद्वितीय प्रगती पाहून आनंद झाला आहे आणि आमचा दरवर्षी शाळेमध्‍ये २०० विद्यार्थ्‍यांचा प्रवेश करण्‍याचा मनुसबा आहे. आमच्‍यासाठी ही अत्‍यंत यशस्‍वी स्थिती आहे. मी आवाहन करतो की, पोदार लर्न स्‍कूल सुरू करण्‍याच्‍या निकषांसाठी पात्र ठरणा-या प्रत्‍येकाने शाळा उघडून त्‍यांचे स्‍वत:चे, तसेच भावी पिढींचे भविष्‍य उज्‍ज्‍वल करावे.”