कोंढवा प्रतिनिधी,
कोंढवा खुर्द येथील स. नं.38 पोकळे मळा, पारगे नगर मधील एका बिल्डिंग चे अनाधिकृत मजले पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पाडण्यात आले.
याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार,
एका बांधकाम व्यावसाईकाकडून अनधिकृतपणे आठ मजली इमारत उभारण्याचे काम सुरू होते , येथील रहिवाश्यांनी वारंवार विरोध करून देखील बांधकाम व्यावसायिक काम सुरू ठेवत होता. स्थानिक नागरिकांचा विरोधाला न जुमानता बिल्डरने वरील मजल्यांचे काम सुरू ठेवले होते. यावेळी मनपाच्या वतीने वरील मजल्यांचे सुरू असल्याचे बांधकाम आधुनिक कटरच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.ही कारवाई पुणे मनपाचे अतिक्रमण अधिकारी झोन 2 चे अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता राहुल साळुंखे , कैलास कराळे, धनंजय खोले, बाळासाहेब बदडे यांनी केली तर कोंढवा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.