पुण्यातील वायफोरडी (Y4D) फाऊंडेशन तर्फे आर्थिक सक्षमीकरण परिषदेचे आयोजन
पुणे: पुणेस्थित वायफोरडी फाऊंडेशन या एनजीओतर्फे आर्थिक सशक्तीकरण परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे त्यांच्या सहाव्या स्थापना दिनानिमित्त करण्यात आले होते. या परिषदेत विविध क्षेत्रातील सर्वोच्च पदावरील नेतृत्वाने देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता असलेल्या शक्यतांवर चर्चा केली. यात विविध माननीय मंत्री, अधिकारी व विविध विषयावरील तज्ज्ञ अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्गदर्शन केले.
“Y4D फाउंडेशन अशा राष्ट्राची कल्पना करतात जिथे प्रत्येक नागरिक आनंदी आणि समाधानी जीवन जगतो. समाजातील वंचित घटकांना सक्षम करून हे उद्दिष्ट सहज मिळवता येणे शक्य आहे. त्यांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग प्रोत्साहन, शिक्षण आणि रोजगाराद्वारे केला जाऊ शकतो. आम्ही भावी पिढ्यांसाठी शाश्वत असणाऱ्या समाजाला घडवण्याच्या दिशेने काम करत आहोत आणि आम्ही सर्व भागधारकांना विनंती करतो की हे मिशन साध्य करण्यासाठी एकत्र येऊन समर्थ भारताचे निर्माण करूयात. ” असे प्रतिपादन श्री प्रफुल निकम, अध्यक्ष वायफोरडी फाऊंडेशन यांनी केले. “हा कार्यक्रम राष्ट्र उभारणीच्या विचारसरणीचा भरीव विस्तार आहे जिथे प्रत्येक नागरिकास सम्मान व सामान संधी उपलब्ध आहेत असेही ते म्हणाले.
याप्रसंगी वायफोरडी फाऊंडेशन व पॉलिसी बाजार यांच्या मध्ये एक सहमती करार करण्यात आला ज्याद्वारे मोठ्या प्रमाणावर युवकांसाठी आर्थिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल व युवकांना त्याच्या आर्थिक कौशल्यांचा विकास करता येईल. आर्थिक साक्षरतेचा मजबूत पाया विविध जीवन ध्येयांना मदत करू शकतो, जसे की शिक्षण किंवा सेवानिवृत्तीसाठी बचत करणे, कर्जाचा जबाबदारीने वापर करणे आणि व्यवसाय चालवणे.
या कॉन्क्लेव्ह दरम्यान ईशान्य फाउंडेशन आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने एक रोजगारक्षमता आणि सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम देखील घोषित करण्यात आला. Y4D फाउंडेशन द्वारे एक विशेष कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे, जे उपेक्षित समुदायाला व्यावसायिक ज्ञान प्रदान करतील, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आणि बाजाराभिमुख शिक्षण मॉड्यूल प्रदान करेल, ज्यामुळे त्यांना नव्या अर्थव्यवस्थेत नव्या व्यवसायाच्या संधी मिळतील.
मोबाईल हेल्थ केअर सेंटर स्थापन करून वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या भागीदारीत आयुष्मान आधार आरोग्य कार्यक्रम नावाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पूर्वी, त्यांनी ७ राज्यांमध्ये १०० आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत, ६ राज्यांत ६ रुग्णवाहिका दान केल्या आहेत आणि दाल लेक, काश्मीरमध्ये वॉटर बोट अॅम्ब्युलन्सची स्थापना केली आहे.
राज्याचे माननीय अर्थमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि उपक्रमांचे कौतुक केले. डिजिटल आणि आर्थिक शिक्षण कार्यक्रमावर भाष्य करताना ते म्हणाले, “Y4D फाउंडेशनने आखलेला सुव्यवस्थित आर्थिक साक्षरता कार्यक्रम भारत सरकारच्या आमच्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या अनेक योजनांच्या अनुरूप आहे. आर्थिक साधने आणि पैसे व्यवस्थापन कौशल्यांबद्दल जागरूकता पसरवने ही काळाची गरज आहे. डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणे हे समाजातील आर्थिक विषमता कमी करण्यास आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी आर्थिक गतिशीलता सुलभ करण्यास मदत करेल. माझा विश्वास आहे की देशातील तरुणांमध्ये कार्यक्षमता आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी Y4D फाउंडेशन सारख्या संस्थां महत्वपूर्ण कार्य करीत आहे.”
या प्रसंगी डॉ अभय जेरे (CIO, शिक्षण मंत्रालय), श्री गौरव दालमिया (अध्यक्ष, दालमिया ग्रुप), श्री सुमित अंतिल (सुवर्ण पदक विजेता, पॅरालिम्पिक), श्री योगेश्वर दत्त (पदक विजेता, ऑलिम्पिक), श्री सिंहराज अदाहाना (पदक विजेता, पॅरालिम्पिक) आणि श्री राधाकृष्णन पिल्लई (लेखक) सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.