उंड्रीत गाई-वासराच्या पूजनाने वसू बारस उत्सहात संपन्न

623

कोंढवा प्रतिनिधी

दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस , वसुबारसेनिमित्त गाय-वासराची पूजा करण्यात आली . उंड्रीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांच्या घरी वसुबारसेनिमित्त अतिशय भक्तिमय वातावरणात

गाय -वासराची पूजा करून हा सण उत्सहात साजरा करण्यात आला. भिंताडे यांनी नागरिकांसाठी गाय वासराची पूजा करण्यासाठी ते उपलब्ध करून दिले होते. भारतीय संस्कृतीत गायीला अनन्य साधारण महत्व आहे. “ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय” असे संतवचन प्रसिद्ध आहे. यातून गायीचे महत्व अधोरेखित होते.

वसुबारस हा गाय आणि वासराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व असते. वसुबारसेच्या दिवशी महिला जनावरांचा गोठा स्वच्छ धुऊन शेणाने सारवून घेतात. वसुबारसेला गायीला सजविले जाते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. घरातील महिला गायीला ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात.

आता बहुतेक भाग शहरी असल्याने आणि मोठं मोठ्या सोसायट्या असल्याने गाय वासरे उपलब्ध होत नाही , ही गरज लक्षात घेऊन भिंताडे यांनी उंडरी परिसरातील सोसायट्या आणि ग्रामस्थांसाठी गाय वासरू उपलब्ध करून दिले होते त्याचा लाभ नागरिकानीं घेतला