उंड्रीत बलिप्रतिपदा-पाडवा उत्सहात साजरा

452

कोंढवा प्रतिनिधी

येथील प्रगतिशील शेतकरी काशिनाथ भिंताडे यांच्या घरी दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा (रेडा, म्हैश पूजन) सगर मोठ्या उत्सहात पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.
महाभारत काळात भगवान श्री कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलून पशुधनाचे संरक्षण केले होते. तेव्हापासुन सगर पूजनाची (रेडा, म्हशी पूजन) सुरवात झाली आहे असे जुने जाणकार सांगतात. पारंपरिक शेती व दुग्ध व्यवसायानिमित्त भिंताडे बांधव दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदानिमित्त सगर उत्सव साजरा करतात. आगामी काळात व येणाऱ्या नववर्षात राज्यासह देशात व समाजात अघटित संकट येऊ नये म्हणून गाई-म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणि यम राजाचे वाहन रेडा यांचे दिवाळी पाडव्यानिमित्त सगर पूजन केले जाते. भिंताडे परिवार म्हैस व रेड्याच्या पूजनाच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठीही परंपरा आजही जोपासत आहे. यावेळी जनसेवक राजेंद्र भिताडे , शेखर भिंताडे , भानुदास भिंताडे , विठ्ठल भिंताडे, तुषार भिंताडे, योगेश भिंताडे, लालचंद भिंताडे, निलेश भिंताडे, श्रीकांत भिंताडे आणि सर्व परिवार उपस्थित होता ..