बी एल मानकर फौंडेशनमुळे दिवाळीत फुलले कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य

897

कोंढवा प्रतिनिधी

दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी याची दूरपर्यंत ओळख नसलेला आदिवासी ,कातकरी समाजाची वस्ती या वर्षी आकाशकंदिल, फराळ आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या भोर मधील कासुर्डे येथील डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे कातकरी समाजातील शेतमजूर बी एल मानकर फौंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मानकर फौंडेशन तर्फे दिवाळी फराळ , आकाश कंदील, पणत्यांचे ,सॅनिटायझरचे वाटप संस्थेचे संस्थापक डॉ. बाळासाहेब मानकर, डॉ. वर्षा मानकर, शिवव्याख्याते तुषार साळेकर आणि नागेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य आणि आनंदाश्रू देखील पहायला मिळाले. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे , समाजात अजूनही काही चांगले लोक आहेत असेच येथील कातकरी-कष्टकरी म्हणत होते. तर प्रसंग पाहून डॉ.बाळासाहेब मानकर व  डॉ. वर्षा मानकर देखील हळवे झाल्याचे पहायला मिळाले.

    बी एल मानकर फौंडेशन बहुउद्देशीय संस्था गेली तीन ते चार वर्षे सतत हा उपक्रम राबवित आहे. याचप्रमाणे नागरिकांसाठी वेळोवेळी आरोग्यशिबिरे तसेच इतर उपक्रम देखील डॉ.बाळासाहेब मानकर व डॉ. वर्षा मानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राबवित असतात. त्यांनी पुणे मनपाच्या स्वछता कर्मचाऱ्यासाठी देखील दिवाळी फराळाचे वाटपाचे आयोजन केले होते


थंडी, ऊन आणि पावसाची तमा न बाळगता शहरात गर्दीने व्यापलेले परिसर असूनही स्वच्छता करण्याचे काम सफाई कर्मचारी वर्षभर अविरतपणे करतात. स्वच्छता हे समाजाच्या प्रगतीचे मूळ असून सार्वजनिक स्वच्छता ठेवणाऱ्यांचा असा सन्मान व्हायला हवा, असे मत थोर समाजसेवक मुरकेवार यांनी व्यक्त केले. बी एल मानकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अप्पर इंदिरानगर येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर दिवाळी आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मानकर,  डॉ. वर्षा मानकर,    मुरकेवार, स्वनिल जगताप, नितीन ननवरे, जयेश शिंदे , ऋषिकेश ओझा, आरोग्य निरीक्षक उमेश ठोंबरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाळासाहेब मानकर म्हणाले कि, ‘सण-उत्सवांच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांची खरी परीक्षा असते. स्वत:च्या घराची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता हे ते दिव्य पार पाडतात. जेथे स्वच्छता असते, तेथेचे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे स्वच्छतेचे श्रेय येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना जाते. कर्मचाऱ्यांनी कोणताही ताण न घेता काम करण्यासोबत व्यसनांपासून दूर राहायला हवे.’ ‘दिवाळीसारख्या सण-उत्सवाच्या काळातदेखील स्वत:च्या घरापेक्षा शहराच्या विविध भागात सफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपली दिवाळी फराळ हा कार्यक्रम त्यांच्यासाठी घेण्यात आला.’

https://m.facebook.com/story.php?story_fbid=867773343936820&id=100024012217133

https://m.facebook.com/story.php?story_fbid=608379720355858&id=100024012217133