Friday, March 21, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीआम्ही कचरा रस्त्यावर टाकणार नाही ! युवानेते संदीप बेलदरे यांचे स्वच्छता अभियान...

आम्ही कचरा रस्त्यावर टाकणार नाही ! युवानेते संदीप बेलदरे यांचे स्वच्छता अभियान आणि जनजागृती मोहिमेस उदंड प्रतिसाद

दत्तनगर जांभूळवाडी परिसरातील इंद्रायणी नगर परिसरातील स्वच्छता…!

पुणे प्रतिनिधी,

स्वच्छता आणि आरोग्याचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे आपले घर तर प्रत्येक जणच स्वच्छ ठेवतो. मात्र आपापल्या घरातून बाहेर पडले की रस्त्यांवर कचरा टाकण्यापासून थुंकण्यापर्यंत अस्वच्छता निर्माण करण्याचे काम अगदी सहजतेने होते. आम्ही कर भरतो हा वृथा अभिमान देखील दाखवला जातो. त्याचवेळी स्वच्छता अभियाना बाबत जागरूकता निर्माण केली जाते, त्या वेळी हे काम शासनाचेच आहे, हा भाव देखील सहजतेने अनेकांच्या मनात येतो. पण असे असताना देखील स्वच्छता राखणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हे भान बाळगत अनेक मंडळी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यात पुढाकार घेतात, तशीच काही मंडळी आपल्यामुळे होणारा कचरा रस्त्यावर कोठेही पडणार नाही, याची काळजी देखील घेतात. तर काही जण आपल्या प्रभागाचा, शहराचा आणि पर्यायाने देशाचा विकास व्हावा, स्वच्छता अभियानात आपलेही काही योगदान असावे या जाणिवेतून कार्यरत होतात, त्यापैकीच एक नाव म्हणजे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते संदीप बेलदरे होय.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एकच नारा स्वच्छ भारत हमारा’ या आवाहानला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंबेगाव, दत्तनगरजांभूळ वाडी परिसरातील इंद्रायणी नगर परिसरात नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास सोसायटी मधील सदस्यांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहवयास मिळाला.

यावेळी आम्ही कचरा रस्त्यावर टाकणार नाही, अशी प्रतिक्षा घेत स्वच्छता मोहीम अधिक व्यापक करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे युवा नेते संदीप बेलदरे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना संदीप बेलदरे म्हणाले,दत्तनगर जांभुळवाडी भागात कचर्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून याठिकाणी खाजगी मालकीच्या रिकाम्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. आम्ही कचरा रस्त्यावर टाकणार नाही ! या स्वच्छता अभियानाअंतर्गत हाच कचरा परिसरातील नागरिकांच्या मदतीने साफ केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना परिसर स्वच्छतेचा एक उत्तम परिपाठ मिळाला.

हि स्वच्छता अभियान राबविण्या साठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी परिसर स्वच्छता राखण्याची शपथ, ‘ओला कचरा सुका कचरा अलगीकरण’ असे विविध उपक्रम राबविण्यात आले. अभियानामध्ये परिसरातील नागरिक, व्यापारी व विविध संस्थांबरोबरच महिलांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला. 

यावेळी भाजपा नेते अमर चिंधे, आश्विनीताई चिंधे, मंगेश जाधव, निकेश गायकवाड, विनोद खुडे, बाजीराव दानवले, संदीप शिरोळे आणि भाजपा कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!