कोंढव्यातील खड्डयांबाबत सागर लोणकर यांचे अनोखे आंदोलन

642

कोंढवा प्रतिनिधी,

कोंढवा परिसरातील रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत, या खड्डयांबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते सागर लोणकर यांनी खड्ड्यामध्ये दिवे लावून प्रतीकात्मक दीपोत्सव साजरा केला..

  या परिसरात अनेक दिवस झाले खड्ड्याचे भीषण प्रश्न उपस्थित झाले आहेत.रस्त्याची दुरावस्था पाहून “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा “हा प्रश्न सर्वसामान्यांना रोज पडत आहे .दुचाकीस्वार यांना तर रस्त्यावर वाहन चालवताना “तारेवरची कसरत” करावी लागत आहे, त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सागर लोणकर यांनी या प्रश्नाला आपल्या विशिष्ट शैलीतून अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे . खड्डयांमध्ये  दीपोत्सव साजरा करून प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. तर  कोंढवा खुर्द भागातील रस्त्यावरील खड्ड्याचे काम अधिकाऱ्यांमार्फत झाले नाही तर याचा जाब सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन  रामटेकडी वानवडी क्षेत्रीय कार्यालयात दीपोत्सव साजरा करू असा इशारा त्यांनी पालिका  प्रशासनास दिला आहे.