Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपी. ए. इनामदार यांना तीन महिन्यात अटक करुन आरोपपत्र दाखल करणार – सीबीआयची कोर्टाला...

पी. ए. इनामदार यांना तीन महिन्यात अटक करुन आरोपपत्र दाखल करणार – सीबीआयची कोर्टाला माहिती

पुणेदि. 24 नोव्हेंबर– नोटबंदीच्या घोषणेनंतर दि मुस्लिम को-ऑप. बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष पी.ए. इनामदार यांनी काही अधिका-यांशी संगनमत करुनएक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण केल्याची तक्रार सीबीआयला करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने २०१८ मध्ये दि मुस्लिम को-ऑप. बॅंकेच्या महाराष्ट्रातील १७ शाखांसह ३२ ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली होती. या छाप्यांमधील जमा केलेल्या कागदपत्रांची छाणणी करण्यात आली असून महत्वपूर्ण धागे मिळाल्याचे सीबीआयने कोर्टासमोर सांगितले. पी. ए. इनामदार यांना आरोपी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सीबीआयने सहकार आयुक्तांना पत्रव्यवहार पुर्ण करून त्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १६४ कलमाप्रमाणे जबाब नोंदवण्याचे काम सुरु असून १२ आठवड्यांच्या आत या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे सीबीआयने कोर्टात भूमिका मांडली. त्यावर कोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य करत त्याची नोंद घेतली. सीबीआयने आपली स्पष्ट भूमिका कोर्टासमोर मांडावी अशी मागणी फिर्यादींनी केली होती. तसेच हि केस ठराविक वेळेच्या बंधनात चालवण्याची देखील मागणी केली होती. त्यावर फिर्यादिंच्या मतांची दखल कोर्टाने घेतली.

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर इनामदार यांनी मनी लॉंडरिंगद्वारे बॅंकेत गैरव्यवहार केल्याची तक्रार तहेरिक-ए-अवामी महाज चे सदस्य आसिफ खान यांनी केली होती. तसेच बॅंकेचे संचालक एस.एम. इक्बाल यांनीही बॅंकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावरून सीबीआयने 2018 मध्ये संपुर्ण राज्यात बॅंकेच्या शाखांवर छापेमारी करत महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यामध्ये पुण्याच्या मुख्य शाखेसह बारामती आणि लोणावळ्याच्याही शाखांचा समावेश होता. तसेच सहकार आयुकतानी पी.ए. इनामदार यांना आरोपी करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती मुस्लिम को-ऑप. बॅंकेचे संचालक एस.एम. इक्बाल  यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!