आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा : योगाचार्य दिपकजी महाराज

1003

कोंढवा/ कात्रज

आईमध्येच दुसऱ्यासाठी जगण्याची शक्ती आहे . आई वडील हेच आपले सर्व काही आहेत , त्यांची सेवा करा , तुम्हाला जगतातील सर्व सुखे आपोआप पायाशी लोटांगण घालत येतील. केवळ समाज प्रबोधनाची कीर्तने न ऐकता संतांनी सांगितलेल्या मार्गांचा अवलंब करावा. जिवंत असतानाच आई वडिलांची सेवा करावी. प्रत्येकाने आपले मन आतून स्वच्छ ठेवावे. स्वत:च्या शरीराची पूजा करा, आपल्या विरोधकांचे नेहमी चांगले चिंतत जावा, तुमचे त्याच्या दुप्पट चांगले होते, त्यामुळे आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे असे प्रतिपादन योगाचार्य दिपकजी महाराज यांनी कात्रज येथील आरोह मंगल कार्यालयात सात दिवसीय मोफत योग शिबिरात आपल्या साधकांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन व्यक्त केले. ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप बेलदरे पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप बेलदरे पाटील यांनी आयोजित केलेल्या मोफत योग शिबिरास नागिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. योगाचार्य दिपकजी महाराज आणि त्यांच्या साधक कोचर टीमने उपस्थित नागरिकांकडून रोज वेगवेगळी आसने करून घेतली. त्यांना योगा सहज सोप्या पद्धतीने शिकवीला. नागरिकांनी देखील त्याच तत्परतेने योगासने करून गुरुदेवांची मने जिंकली. योग शिबिरात नागरिकांना रोज वेगवेगळे संगीत , योगा, मेडिटेशन आणि झुंबा, योग निद्रा ,पॉवर सूर्यनमस्कार, रोप स्ट्रेचिंग, स्टिक एक्सरसाइज, म्युझिक थेरपी, दिव्य बोध साधना,आणि इतरही बरेच काही साधना, योग प्रकार योगाचार्य दीपकजी महाराज यांनी उपस्थित नागरिकांना दिली.

शिबीर समारोप प्रसंगी माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, नगरसेविका मनीषाताई कदम, राजाभाऊ कदम,   संदीप बेलदरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, रेल्वे पोलीस अधिकारी, पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी, पत्रकार, उद्योजक, तसेच उंड्रीतील भाजपा युवानेते , जनसेवक राजेंद्र भिंताडे तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी साधक परिवारातील सुधीर गरुडसर, केंद्राचे अध्यक्ष शशिकांत आनंददास, अश्विनी पासलकर, ममता चोरडिया, प्रतिभा मोरे, आरती मॅडम, मंगल मोरे, विजय लोणकर, रवींद्र औटी, पायगुडेसर, सुरेश मोरे, बंडू गोगावले, अविनाश गोगावले, आशा दांगट, कुमुदिनी शहा, शैला कोठावळे, संदीप गायकवाड, अजयसर, किशोर चौधरी, हेंमंत पवार, दीपक गोरे, तांबे सर, दुधे सर, दशनाम सर , अनुजा लोणकर, वैशाली गोरे, शशिकांत पुणेकर, संतोष गोरड, नवनाथ मोरे, गणेश नलावडे, जेष्ठ पत्रकार अनिल चौधरी आदी उपस्थित होते.