आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील एम. आय. टी. अकॅडमी ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाचे वतीने ‘ जागतिक महिला दिन ´ संस्थेचे संचालक डॉ. महेश गौडर यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात परिसरातील तसेच महाविद्यालयातील महिला कर्मचारी, युवती यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला. बचत गट स्टॉलला यावेळी मोठा प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आई मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पीटल डुडुळगाव संचालक एमएस स्त्री रोग प्रसुती तज्ज्ञ डॉ. दिशा रविकुमार शिंदे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ‘ मोनोपॉज म्हणजे स्त्रीयांची पाळी जाण्याची वेळ याबद्दल संवाद साधला त्याबद्दल बोलतांना त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे पाळी जाताना स्त्रीयांनी काय काळजी घेतली पाहिजे. त्याचे लक्षण काय इत्यादी बद्दल सविस्तर माहिती देत महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी आळंदी नगरपरिषद माजी उपनगराध्यक्षा श्रीमती पारुबाई तापकीर यांचे वतीने स्वच्छता कर्मचारी यांना बॅगेचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्य म्हणून ‘ विघ्नहर्ता बचत गट ´ आणि ‘अहिल्याराणी बचत` गट आळंदी यांनीही यावेळी उपस्थिती होती. दोन्ही बचत गटाची व्यावसायिक दुकाने एका दिवसा करिता सुरू ठेवण्यात आली. यामधून या बचत गटांना काही प्रमाणात उत्पन्न महाविद्यालयातून मिळाले.
ह्या कार्यक्रमाचे संयोजन योगिनी केंद्रे, जयश्री यद्दनवार, श्रध्दा शेंडे, शिल्पा शिंगारे, राजश्री काकतीकर, ताई ज्योती, तेजल त्रिलोकेकर, जयश्री वाळुंजकर आदी महिला कर्मचाऱ्यानी उत्साहात केले.