आळंदीत भक्त निवास इमारतीचे भूमिपूजन

474

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खेड तालुक्याचे पश्चिम भागाचे भामनेेेहेर खो-यातील भाविक,ग्रामस्थ यांची आळंदी चाकण रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ धर्मशाळा असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगल कार्यालय (सभागृह) व भक्तनिवास उभारण्याच्या सुमारे ५० लाख रुपये खर्चाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संस्थेचे जेष्ठ संचालक नामदेव जाधव यांच्या हस्ते उत्साहात झाले.
या भक्तनिवास इमारतीचे बांधकामास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २५ लाख रुपये, खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी १५ लाख रुपये, पंचायत समिती खेडचे माजी उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ५ लाख रुपये, माजी उपसभापती मंदाताई शिंदे यांनी २ लाख रुपये, जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबाजी काळे यांनी ३ लाख रुपये निधी शुद्ध पाण्यास R.O. plant साठी निधी दिला आहे. भाविक वारकरी भक्तांचे सोयीसाठी तात्काळ R.O. plant सुरु करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक दत्तात्रय होले यांनी सांगितले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चे माजी सचिव सतीश चांभारे, पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास गडदे, दत्तात्रेय होले, तुकाराम सावंत, दामोदर आहेरकर, किसन नवले, गिरजू चांभारे, शंकर साबळे, गबाजी खेडेकर, प्रभाकर देवाडे, बबन शिवेकर, तुकाराम गडदे, सिताराम लोहोट, गणपत शिंदे, लक्ष्मण तुपे, रामदास शिवेकर, धोंडीबा शिंदे, योगेश पवार ( कॉन्ट्रॅक्टर), वामन जढर यांचेसह खेड तालुक्यातील ४० गावातील वारकरी , भाविक उपस्थित होते.