कबुतरला दिले जीवदान

326

कोंढवा प्रतिनिधि,

कोंढवा एन आय बी एम रस्त्यावर असणाऱ्या लोणकर हॉल समोरील झाडावर पतंगाच्या मांजात दोन दिवस अडकून असणाऱ्या कबुतराची सुटका ब्रहमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे साधक शंकर शिंदे आणि त्यांच्या इतर साथीदार साधकांनी प्रचंड मेहनत घेऊन सुटका केली.

ब्रह्म मुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचा योगा क्लास सुटल्यावर सकाळी7 वाजण्याच्या सुमारास बाहेरील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या झाडावर खूप कावळे ओरडत होते , त्यामुळे तेथे काहीतरी झाले असेल म्हणून शंकर शिंदे तेथे गेले असता, त्यांनी झाडावर पाहिले असता, त्यांना एक कबुतर पतंगाचा मांजा मुळे उलटे लटकत असलेले दिसले, त्यांनी याची माहिती त्वरित त्यांच्या इतर साधकांना देऊन क्षणाचाही विलंब न लावता, झाडावर चढायला सुरुवात केली, वास्तविक हे झाड खूप जुने झालेले होते व फांद्या सारख्या तुटत होत्या, अशा कठीण प्रसंगात त्यांनी आपल्या  जीवाची पर्वा न करता तसेच मित्राच्या सल्ल्याने कसेतरी टोक घाठून कबुतर बसलेल्या फांदीला पकडले व कबुतर खाली आणून आपल्या इतर साधक राजेंद्र भिंताडे, शशिकांत पुणेकर, कालिदास लोणकर, नाना फुलावरे, अनिल चौधरी, विजय लोणकर, नितीन धोत्रे, प्रदीप पवार, सतिश शिंदे यांच्या सहकार्याने त्याच्या पायांमध्ये अडकलेला मांजा काढून टाकला व कबुतरास पुन्हा नैसर्गिक वातावरणात सोडून देण्यात आले.. कबुतरास मांज्यामुळे पायास जखमा झाल्या होत्या पण त्याने उडान घेतल्याने सर्वाँना खूप आनंद झाला होता,

पतंग उडविताना नागरिकांनी दक्षता घ्यावी , चायनीज मांजाचा वापर करू नये, पतंगाचा पेच घेऊ नये ,यामुळे पतंग कट होऊन असे उंच झाडांवर , इमारतीवर जाऊन अडकतात आणि निष्कारण मुक्या जीवांना नाहक त्रासाला बळी पडावे लागते.तर या प्रसंगामुळे ब्रह्ममूहूर्त केंद्राचे साधकांनी शपथ घेतली की ते यापुढे पतंग उडविणार नाही.