Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीज्येष्ठ पत्रकार संजय अगरवाल यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रसार माध्यम व प्रसिद्धी...

ज्येष्ठ पत्रकार संजय अगरवाल यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रसार माध्यम व प्रसिद्धी विभाग समन्वयक पदी नियुक्ती

अनिल चौधरी,पुणे

पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले संजय अगरवाल यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रसारमाध्यम व प्रसिद्धी विभाग समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे

शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते अगरवाल
यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत संपर्क साधून पक्ष विस्तार करण्याच्या सूचना संजय अगरवाल यांना नियुक्ती पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनहिताच्या योजना आणि कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून जिल्हा जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संपर्क साधण्याच्या आणि पक्ष आणि सरकारी योजनांचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल संजय अगरवाल यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. जनता आणि पक्ष यांच्यातील दुवा बनून जनहिताच्या योजना आणि कार्याचा अधिकाधिक
लोकांपर्यंत लाभ पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!