मल्हार न्यूज,पुणे
लेखक प्रदीप मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘मेसेज फ्रॉम गॉड’ या इंग्रजी पुस्तकाच्या ‘परमात्माचा संदेश’ बहुप्रतीक्षित मराठी आवृत्तीचे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे करण्यात आले. कार्यक्रमाला प्रदीप मुखर्जी यांच्यासह फाल्गुनी पाठक व आदि मान्यवर उपस्थित होते.
‘मेसेज फ्रॉम गॉड’ हे धर्म आणि अध्यात्मावरील सखोल, परिवर्तनशील दृष्टिकोन देणारे पुस्तक आहे. ह्या माध्यमातून वाचकांना थेट देवाशी जोडले जाण्याचा नाविन्यपूर्ण आणि सखोल मार्ग व वैयक्तिक बदलाचा अनुभव प्राप्त होतो. वाचनाच्या ३० दिवसांच्या कालावधीत वाचकांचा आत्मशोधाच्या दिशेने प्रवास सुरू होतो.
देवाकडून मिळालेल्या संदेशाचे सार हे समजण्यात आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये मध्यस्थ, कर्मकांड किंवा विश्वासावर आधारित अडथळ्यांशिवाय थेट ईश्वराशी संपर्क साधण्याची क्षमता आहे. हे पुस्तक केवळ लेखन नाही तर वैयक्तिक जीवनाचे साधन आहे. जीवनातील बदल वाचकांना आत्मशोधासाठी प्रोत्साहन देते आणि मला आशा आहे की हे पुस्तक लोकांना धार्मिक पारंपरिक मर्यादेच्या पलीकडे मुक्ती आणि उपचाराचा मार्ग दाखवेल, असे ‘मेसेज फ्रॉम गॉड’चे लेखक प्रदीप मुखर्जी म्हणाले.
भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सीमा ओलांडून जगभरातील लोकांवर प्रभाव टाकण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते. ते वाचकांना केवळ ज्ञान आणि माहिती देत नाही तर मानवी अनुभवाची सखोल दृष्टी प्रदान करतात. तसेच सहानुभूती, सर्जनशीलता आणि जिज्ञासा निर्माण करून बदल घडवणारी शक्ती बनतात, जी व्यक्ती आणि समाजावर सारखाच प्रभाव टाकतात, वैयक्तिक विकास आणि सामूहिक परिपक्वतेचा मार्ग प्रदान करतात.
हे पुस्तक कोणत्याही पारंपरिक धार्मिक ग्रंथ किंवा सिद्धांतासारख्या धार्मिक पंथाशी जोडलेले नाही. हे थेट देवाशी जोडण्याचा मार्ग देते, ज्यामुळे वाचकांचा विश्वास, भक्ती किंवा कोणत्याही संस्थेशी संबंध न जोडता मार्ग मिळू शकतो.
पुस्तकात हिलिंग कार्ड्सची ओळख करू देण्यात आली आहे. जी वाचकांना आत्मशोधात सहभागी होण्यासाठी मदत करतात. वाचकांनी या अनोख्या साधनांसह त्यांच्या संवादाद्वारे जीवनातील लक्षणीय सकारात्मक बदल नोंदवले आहेत.
‘परमात्माचा संदेश’चे प्रकाशन पुण्यात होणे हा एक महत्त्वाचा क्षण आहे, आम्हाला आशा आहे की हे पुस्तक वैयक्तिक जीवनातील बदलाला प्रेरणा देत राहील, वाचकांना आत्मशोधाचा एक अनोखा मार्ग प्रदान करेल. लोक ‘परतात्माचा संदेश’शी जोडले गेल्यानंतर त्यांचा सकारात्मक वाटेवरील प्रवास नक्कीच प्रोत्साहनपर राहील आणि ह्यात आम्हीदेखील वाचकांना मदत करण्यासाठी तत्पर असू.