बिबवेवाडीत मारहाण करीत गाड्या फोडणाऱ्या आरोपींना 24 तासात अटक

948
भूषण गरूड पुणे
बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ५ ते ६ फेब्रुवारी २१०९ रोजी ११.३० ते १.४५ रात्रीच्या सुमारास गुरुदत्त मित्र मंडळ चौक, घोडे वाल्याची चाळ, सुपर इंदिरानगर येथे मारहाणीचा जाब विचारल्याच्या राग येऊन आरोपींनी फिर्यादीला महारान करीत वाचवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आजीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले व हातात कोयते, लाकडी दंडुके घेऊन परिसरात दहशत माजवत रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व तीनचाकी गाड्या फोडल्या.
(संग्रहित छायाचित्र)
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास फिर्यादी प्रसाद तानाजी जोंजद(वय 25, रा.सुप्पर इंदिरानगर) याचा भाऊ मनीष नेताजी जोंजद याला मारहाण केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने आरोपी आप्पा उर्फ नरेश बळीराम दयाळू(वय २४), तुषार सुरेश येरंवडे(वय २१), धनंजय शंकर इंगुळकर(वाय २१) सर्व राहणार शेळके वस्ती, अप्पर इंदिरानगर पुणे. यांनी फिर्यादीचा भाऊ ओंकार जोंजद व मनीष जोंजद यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादीची आजी शांताबाई दादाराव जोंजद(वय ६८) हे वाचवण्यासाठी आले असता आरोपी आप्पा उर्फ नरेश दयाळू याने आजीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. व पुन्हा दिनांक६ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १.४५ च्या सुमारास घोडेवाल्याची चाळ,सुपर इंदिरानगर येथे हातात कोयते, लाकडी दंडुके घेऊन परिसरात दहशत माजवत रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व तीनचाकी गाड्या फोडल्या याची तक्रार बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
    या घटनेचा तपास बिबवेवाडी पोलीस करत असताना. पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी अप्पर डेपो येथील शनि मंदिराच्या ठिकाणी पहाटे २.३०  च्या सुमारास येणार आहेत. ही माहिती मिळताच  बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण आडके, सहाय्यक पोलीस शिपाई लोधा, पोलीस शिपाई लोखंडे, पोलीस शिपाई राख, पोलीस हवालदार दबडे, सहाय्यक पोलीस शिपाई रोहित शिंदे यांनी सापळा रचून आरोपीस अटक केली.
       सर्व आरोपींना 24 तासाच्या आत अटक केल्याने पोलिसांच्या कर्तबगारीची प्रशंसा परिसरात होत आहे.
पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.