पुणे मनपा सफाई कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर सापडलेले दिड किलो चांदिचे दागिने पोलीस ठाण्यात केले जमा

1379

भूषण गरुड,पुणे

पुणे महानगरपालीकेचे सफाई कर्मचारी कस्तुराबाई गोरख हनवते, वय ५० वर्षे रा.पर्वती दर्शन पुणे यांनी रस्ता सफाई करताना सापडलेले चांदीचे दागिने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जमा केले. याबद्दल नगरसेविका मानसी देशपांडे यांनी पोलीस ठाण्यात कर्मचारी महिलेचे अभिनंदन केले.
कस्तुरबा हनवते आपले नेहमी प्रमाणे नेमुण दिलेले काम कोठारी ब्लॉक बिबवेवाडी येथील रोडवरील साफ सफाई करीत  होत्या. असज सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांना एक प्लॅस्टीकची पिशवी उचलुन त्यांच्या जवळील प्लॅस्टीकच्या बकेटमध्ये टाकली असता, पिशवीचा टाकल्यानंतर धातु पडल्यासारखा आवाज आल्याने, त्यांनी सदरच्या पिशवी मध्ये पाहिले असता त्यांना पिशवीमध्ये अंदाजे दिड किलो चांदीचे गणपतीचा साज असलेले दागीने मिळुन आले,  त्यांनी सदर बाब त्यांचे सफाई निरीक्षक श्री सचिन पवार पुणे मनापा यांचे निदर्शनास आणुन दिली.  मनपा आरोग्य विभागाने प्रथम पोलीस ठाणेस संपर्क करुन त्याची माहिती दिली. त्यांनी स्थानिक नगरसेवीका मानसीताई देशपांडे यांचेसह पोलीस ठाणेस येवुन सदर पिशवी पोलीसांच्या ताब्यात दिली.  सदर दागीन्यांबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे तपास करीत आहेत.
सफाई कर्मचारी सौ. कस्तुराबाई हनवते यांनी वरीलप्रमाणे अंदाजे किंमत ९००००/- रुपये किंमतीचे अंदाजे दिड किलो चांदीच्या वस्तु बाबत कोणताही मोह न दाखविता अतिशय प्रामाणिकपणे सदरचे दागिने पोलीसांकडे सुपूर्त केल्याबाबत त्यांचा बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे मानसीताई देशपांडे यांचे उपस्थितीत मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर करपे यांचे हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवुन अभिनंदन करून सत्कार केला.