कोंढवा प्रतिनिधी,
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित प्रवेश केला.
दरम्यान कामठे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला जबरी फटका बसला असून भाजपा मात्र हडपसर विधानसभा मतदार संघात अधिक मजबूत झाली आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी त्यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले आहे.