जन्मदात्या बापाचा मुलावर गोळीबार

838

अमीन शाह

अकोला, दि.०३:- जन्मदात्या बापाने मुलावर गोळी झाडून
त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी
अकोल्यात घडली. बाबा भारती असे वडीलाचे नाव असून, त्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मुलगा मनिष भारती हा जागीच ठार झाला. गोळीबाराच्या या थराराने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.
सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्राणी मतिमंद शाळेजवळ असलेल्या ब्रम्हांडनायक अपार्टमेंट मध्ये मनीष भारती यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये तो सोमवारी दुपारी बारा वाजता असताना त्याचे वडील बाबा भारती यांनी मनीष वर गोळी झाडून त्याची हत्या केली.

मनीष भारती हा त्याचे वडील बाबा भारती यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या बेतात होता, अशी माहिती समोर येत आहे. मनिष भारती याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी बाबा भारती यांनी त्याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात मनिष भारती यांचा जागेवरच मृत्यू झाला, असे पोलिसांकडून समजले आहे. घटनेची वार्ता कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बाबा भारती यांना ताब्यात घेतले. वृत्त लिहीस्तोवर त्यांच्याविरु –
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.