अर्जुन मेदनकर आळंदी,
येथील जनसेवा क्लिनिक मधील कार्यरत नामंवत डॉ.संजय हिरे यांनी एका गरजु महिला रुग्नाची त्यांच्या स्वत:चे लाईफ़ लाईन हॉस्पिटल भोसरी येथे मोफ़त शस्त्रक्रिया करीत सामाजिक वैद्यकीय बांधिलाकी जोपासली.
लॉकडॉऊनच्या काळात निरधार विधवा महिला श्रीमती. विनाबाई पांढरे ( वय ५० वर्षे ) यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळ्या. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचे कोपराचे हाड चकनाचुर झाले. या मुळे त्यांनी जनसेवा क्लिनिक मध्ये डॉ.संजय हिरे यांचेकडे संपर्क केला. शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ५० हजार रूपये असताना सामाजिक बांधिलकीतून महात्मा ज्योतीबा फ़ुले योजना अंतर्गत श्रीमती विनाबाई पांढरे यांची मोफ़त शस्त्रक्रिया या योजनेतून करण्यात आली. कोरोनाच्या भितीच्या सावटा खाली सर्व प्रकारच्या खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाय योजना करुन डॉ.संजय हिरे, डॉ.संजय साळ्वे व प्रसिद्ध भुल तज्ञ डॉ.दिपक शिंदे यांनी यशस्वी रित्या सदरची शस्त्रक्रिया पार पाडली. गरीब व गरजूसाठी व समाजातील सर्वस्थरातील लोकासाठी लाईफ़लाईन हॉस्पिटल भोसरी येथे महात्मा ज्योतीबा फ़ुले जन आरोग्य योजना अंतर्गत रेशन कार्ड धारकांना सर्व आजारांवर उपचार केले जात आहेत.यात शस्त्रक्रिया दखल मोफ़त केल्या जाणार असल्याचे लाईफ़लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय हिरे व डॉ.संजय साळ्वे यांनी सांगितले. गरजूंची लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.