शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

514

गणेश जाधव,

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे त्याचप्रमाणे लॉक डाऊनची परिस्थिती पाहता अनेकविध आरोग्याच्या समस्या सर्वसामान्यांना भेडसावत आहेत यातच रुग्णालयात दाखल झालेले संशयित कोरोना रुग्ण यांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना सदृश्य परिस्थिती पाहता सर्वसामान्य जनतेस रक्तदान करण्याचे अवाहन केले होते, त्यांनी केलेल्या अवाहनाला साद घालत कोंढवा खुर्द येथील हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक भरत चौधरी, शिवसेना युवा संघटनेचे प्रसाद बाबर आई प्रतिष्ठाण कोंढवा खुर्द पुणे साईनाथ तरुण मंडळ, वेताळ मित्र मंडळ, शिवसंगम मित्र मंडळ ( ग्रेट यंग सर्कल ), हिंदू – मुस्लिम एकता कमिटी, सायबा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलीस आयुक्त ( वानवडी विभाग पुणे शहर ) सुनील कलगुटकर , पोलीस निरीक्षक महादेव कुंभार , पीएसआय संतोष शिंदे मा. आ. महादेव बाबर, मा. नगरसेवक भरत चौधरी, पंढरीनाथ लोणकर ( ह. भ. प. )सुनील कामठे ( ह. भ. प. ), अविनाश बाबर, जितेंद्र भाडळे,गणेश लोणकर (. रोहन गंगाधरे , सचिन कापरे, शंकर लोणकर , ज्ञानेश्वर भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या रक्तदान शिबिरामध्ये आरोग्यविषयक सर्व काळजी घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत रक्तदान शिबिराचे नियोजनबद्द कार्यक्रमाला सुरूवात केली गेली.

शिवसेना युवा संघटनेच्यावतीने कोंढवा परिसरात असलेल्या अनेक सामाजिक व धार्मिक मंडळांना रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले. अनेक सामाजिक संघटनांनी, धार्मिक मंडळांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरामध्ये तरुण वर्गाने प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली .रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस शिवसेना युवा संघटनेच्यावतीने 2 किलो बासमती तांदूळ , १ सनीटायझर ,१ मास्क, प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

रक्तदान शिबिराचे नियोजन पुणे ब्लड बँकचे संस्थापक राहुल शिंदाने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले एकूण १४० लोकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिरास नगरसेवक मारूती आबा तुपे नगरसेविका संगीताताई ठोसर तसेच अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या व रक्तदानास प्रोत्साहन दिले.

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=736016620542072&id=100024012217133
शिवसेना युवा संघटनेचे प्रसाद बाबर यांनी कोरोना सदृश्य परिस्थितीत देखील लोकांनी जो उस्फुर्त सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले तसेच आपण सर्वजण एक होऊन कोरोनाला निश्चित पणाने हरवून दाखवू असे अभिवचन दिले.समाजातील अनेक घटक एकत्र येऊन रक्तदानसारखे श्रेष्ठदान करू शकतात याचं हे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवू पाहतोय असे त्यांनी मत व्यक्त केले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=736011607209240&id=100024012217133