अर्जुन मेदनकर,आळंदी
: येथील मंदिरातून माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवारी (दि.१३ ) दुपारी चारच्या सुमारास होणार आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तसेच आळंदीत प्रशासकीय तयारी करर्ण्यात आली आहे. अवघी अलंकापुरी श्रींचे प्रस्थान सोहळ्यास सज्ज असून यावर्षी कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रींचे पादुका प्रस्थान दिनी मंदिरात केवळ ५० व्यक्तींचे हजेरीत प्रस्थान सोहळा हरिनाम गजरात होणार आहे. मात्र या निमित्त मंदीर भाग १०० मीटर पर्यंत व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी समिर भुमकर यांनी सांगितले.
या वर्षी श्री माउलीं च्या पालखी प्रस्थान सोहळा दिनी शहरातील मंदिर परिसरातील १०० मीटर भागातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्याच्या सूचना आळंदी नगरपरिषद प्रशासनाने व्यापा-यांना दिल्या आहेत. येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये कुऱ्हाडे आळी मध्ये एका कोराणा बाधित महिलेचे नुकतेच या आजाराने निधन झाल्याने खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी यांनी दिलेल्या आदेशा नुसार मंदिर लगतचा काही परिसर प्रतिबंधित व काही परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे. या मुळे माउली मंदिर परिसरात व्यापा-यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. या आदेशाची दक्षता घेऊन व्याप-यांनी दुकाने प्रस्थान दिनी उघडू नयेत असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समिर भुमकर यांनी केले आहे.
आळंदीतही पंढरपूर प्रमाणे शहरातील सर्व धर्मशाळा, मठ, लॉज मालक, चालक, व्यवस्थापक यांना आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने भाविक, बाहेरील नागरिकांना निवासास उपलब्ध करुन देण्यात येऊ नये अशा नोटिसा देऊन कारवाईचा अशा नोटिसा देऊन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय साथरोग कायदा १८९७ नुसार तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आळंदीतील धर्मशाळा आणि संबंधितांना देण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी समिर भुमकर दिली.
मोजक्या ५० मान्यवरांचे उपस्थितीत आज आळंदीत प्रस्थान सोहळा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खेड महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व आळंदी नगरपरिषद प्रशासन तसेच आळंदी देवस्थानने आषाढी वारी सोहळा कमीत – कमी ५० लोकांत हरिनाम गजरात प्रथा परंपरांचे पालन करीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंदिरात केवळ ५० पासधारकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.यामुळे इतर नागरिक,भाविक यांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अनेक बंधने घातली असून दक्षता घेण्याचे सूचनादेश दिले आहेत .या मुळे यावर्षी सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक उपक्रम साजरा करण्यास मज्जाव आहे. परवानगी देण्यात आली नाही. या मुळे यावर्षीचा माउलींचा पालखी सोहळा प्रस्थान देखील साधे पणाने होणार आहे. आषाढी वारीसाठी माउलींच्या पादुकांचे प्रस्थान देखील यात ५० मोजक्याच लोकांत होणार आहे. माऊलींचे पालखी सोहळ्याचे शनिवारी आळंदीतुन प्रस्थान होणार आहे.यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आळंदीत अनेक बंधने लागू करणारे आदेश दिले आहेत. त्यानुसार ५० लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. इतर भाविक, वारकऱ्यांनी आळंदी मंदिर व परिसरात गर्दी करू नये असे आवाहन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगेपाटील यांनी केले आहे.
लाखो भाविकांचे उपस्थितीत होणार सोहळा यावर्षी कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी अगदी मोजक्या लोकांत होणार आहे. मात्र या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने सोहळा घरी राहून सुरक्षित पणे पाहता येणार असल्याने आषाढीवारी प्रस्थान सोहळा कोरोनाचे पार्शवभूमीवर प्रत्येकासाठी स्मरणात राहणारा सोहळा ठरणार आहे. यामुळे वारकरी , भाविकांनी आळंदीत गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त स्मिता पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर,मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.
यावर्षी देशासह राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी राज्यातील ठिकठिकाणाहून निघणा-या संतांचे पायी वारी पालखी सोहळे तसेच माऊलीचा पायी वारी पालखी सोहळा देखील रद्द झाला आहे. मात्र वारीची परंपरा कायम ठेवण्यासाठी श्रींचे पालखी पादुकांचे प्रस्थान व इतर धार्मिक, उपचार व कार्यक्रम कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र कोरोनाचे पार्शवभूमीवर यावर्षी अंकली ते आळंदी असा हरिनाम गजरात प्रवास करीत येणारे श्रींचे अश्व यावर्षी मात्र आळंदीत शुक्रवारी (दि.१२) प्रस्थान सोहळयास प्रवेशले नाहीत. परंपरेने अश्वांचे प्रस्थान झाले. मात्र आळंदीकडे पाच पाऊले प्रस्थान झाल्यानंतर अश्व अंकली मधील श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचे राजवाड्यातच विसावले. माउलीचे पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून शनिवारी (दि.१३) दुपारी चारच्या सुमारास साधे पणाने लवाजमा शिवाय प्रस्थान होत आहे.यावर्षी प्रस्थान सोहळ्यास मात्र लाखो भाविकांच्या गर्दीतील हरीनाम गजर होणार नसल्याने इंद्रायणी नदी घाट व परिसर मोकळा असून नेहमी गर्दीने फुललेले रस्ते व नदी किनारा यावर्षी गर्दी मुक्त राहिला आहे. आळंदी नगरी प्रस्थान सोहळ्यास सज्ज झाली आहे. माउली मंदिरातही प्रस्थान सोहळ्याची तयारीची लगबग अंतिम टप्प्यात असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. असा आहे दिनक्रम श्रींचा पालखी प्रस्थान सोहळा
आळंदी मंदीरात पहाटे घंटानाद,काकडा आरती,पवमान अभिषेक,पंचाम्रूत पुजा,दुधारती त्यानंतर सकाळी नऊ वाजता कीर्तन विणा मंडपात,बाराचेसुमारास श्रींचा गाभारा स्वच्छता,श्रींचे समाधीवर पाणी अर्पण व महानैवेद्य होईल.दुपारी चारचे सुमारास श्रींचे पालखी सोहळा प्रस्थानला सुरुवात होईल.यावेळी श्रींची आरती श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे वंशज प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते तसेच आळंदी देवस्थान तर्फे आरती,प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप,यानंतर श्रींचे चल पादुका विणा मंडपात येतील.संस्थान तर्फे मानकरी यांना पागोटे वाटप,श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे प्रतिनिथी यांचेकडुन प्रमुख मानकरी ,प्रतिष्ठीत व दिंडी प्रमुख यांना नारळ प्रसाद वाटप होताच श्रींचे पालखीचे हरीनाम गजरात विणा मंडपातुन प्रस्थान होणार आहे.मंदीर प्रदक्षिणा होऊन श्रींचे पालखीचे दर्शन मंडपात आगमन व समाज आरती होऊन सोहळा ३० जुन पर्यत विसावणार आहे.दरम्यान परंपरेचे कार्यक्रम आजोळघर दर्शनबारी हाँल मध्ये होणार आहेत,