नायगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

539

चंद्रकांत चौंडकर, पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील नायगाव येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.या दिवशी कोरोनाचे सावट त्यातच पाऊस येत असल्याने सोशल डिस्टन्स ठेवत  स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी जय,जय जवान जय किसान,वंदे मातरम,भारत माता की जय आशा घोषणा दिल्या.यावेळी श्रीमती दगडूराम चोपडा इमारती समोरील ध्वजारोहन नायगाव सोसायटीचे चेअरमन विलास खेसे, श्री सिद्धेश्वर विद्यालय येथील ध्वजारोहन पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुहास खेसे, ग्रामपंचायत येथील ध्वजारोहन सरपंच दिपाली जगताप,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथील ध्वजारोहन पशुधन पर्यवेक्षक डॉ दत्तात्रय भिसे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौंडकरवाडी येथील ध्वजारोहन ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौंडकर यांनी केले.यावेळी थोड्याच उपस्थितांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी,कर्मचारी, शिक्षक,ग्रामस्थ आदी उपस्थित होते