उंड्रीतील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द

308

पुणे प्रतिनिधी,

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उंडरी ग्रामस्थांच्या वतीने येत्या 14आणि 15 एप्रिल (बुधवार-गुरुवार) रोजी साजरा होणारा श्री भैरवनाथ यात्रा उत्सव शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थ आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित श्री भैरवनाथ यात्रा निमित्ताने होणारे धार्मिकविधी, आरत्या केल्या जातील.
या यात्रा कालावधीत श्री. भैरवनाथ देव भक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. एकूणच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भावावर वाढत असल्याने वाढती रुग्ण संख्या आणि यात्राउत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू शकत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उंडरी भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी सुभाष टकले, गणेश घुले, राजेंद्र भिंताडे, सचिन घुले, निवृत्ती बांदल, गणेश पुणेकर, उत्तम फुलावरे, सुभाष घुले, प्रवीण अबनावे, राहुल भिंताडे, जालिंदर कामठे, अमोल कानडे, विशाल कामठे, वसंत कड, तानाजी कड, दत्तोबा होले, मोहन होले, कैलास पुणेकर, दादासाहेब कड, प्रफुल्ल कदम, बाळासाहेब टकले जगन्नाथ कांबळे, सदाशिव पुणेकर, नामदेव होले, अरुण आंबेकर, सचिन पुणेकर, लक्ष्मण शेंडकर, दिलीप अबनावे, नवनाथ अबनावे आदी उंड्री ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ आणि नागरिक यांनी घरी राहा आणि सुरक्षित राहा, वारंवार आपले हात स्वछ करा, सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी केले आहे.