कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ‘शतप्लस’ म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आशेचा किरण – हणमंतराव गयकवाड, 

589
पुणेः– बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड (बीव्हीजी ग्रुप कंपनी) ही पर्यावरणपुरक आणि नाविन्यपूर्ण
औषधांची निर्मिती करणारी कंपनी असून सध्याच्या कोविड 19 च्या महामारी काळात रोग प्रतिकारकशक्ती वाढवून कोविड 19 चा आजार नियंत्रणात आणू शकणारे शतप्लस हे औषध म्हणजे निरोगी शरीरासाठी आणि चाांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण आहे, असा आशावाद बीव्हीजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि संचालक हणमंतराव गयकवाड यांनी व्यक्त केला. 
 बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडतर्फे निर्माण करण्यात आलेल्या आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती संतुलीत करणा-या शतप्लस या आयुर्वेदिक औषधाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी नायडू हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ.सुधीर पाटसुटे, बीव्हीजी ग्रुपच्या बीव्हीजी लाईफ सायन्स लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. पवन के. सिंघ आणि वैद्य हरिष पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना हणमंतराव गयकवाड म्हणाले की, बीव्हीजीने अनेक वर्षे संशोधन करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि विविध व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यासाठी विशेषतः आर अँड डी आधारित शतप्लस हे आयुर्वेदिक औषध विकसीत केले आहे. हे औषध वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असून त्यात अँटी ऑक्सिडेटीव्ह, अँटी इंप्लेमेटरी, अँटी व्हायरल आणि इम्युनो मॉड्युलेटरी गुणधर्म आहेत. शतप्लस चिकीत्सेमुळे प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये सार्स कोविड विषाणूच्या संख्येत 94 टक्के घट दिसून आली आहे. डॉ. नायडू संसर्गजन्य रूग्णालयात करोनाबाधीत रूग्णांवर सीआरटीआय च्या मार्गदर्शक तत्वांनुसार केल्या गेलेल्या अभ्यासाच्या अंती शतप्लस एक सहाय्यक उपचार पद्धती म्हणून पुढे आली आहे. उपचारांच्या पहिल्या 4 दिवसातच 73 टक्के, सातव्या दिवशी 96.7 टक्के, तर उपचाराच्या दहाव्या दिवशी शंभर टक्के शतप्लस उपचार गटातील रूग्णांना फायदा झालेला दिसून आला आहे. 
यावेळी बोलताना नायडू हॉस्पीटलचे सुप्रिटेंडंट डॉ.सुधीर पाटसुटे म्हणाले की, कोविड 19 च्या उपचारांमध्ये अनेक घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. कोणत्याच अमूक एका औषधाने कोविडवर मात करता येते असे म्हणता येत नाही. मात्र, अशा परिस्थितीत शतप्लस हे औषध रोग प्रतिकारक शक्ती वाढवून रूग्णाच्या उपचरांमध्ये सहाय्यकारक म्हणून महत्वाची भूमिका बजावते आहे. 
यावेळी बोलतांना बीव्हीजी ग्रुपच्या बीव्हीजी लाईफ सायन्स लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. पवन के. सिंघ म्हणाले की, शतप्लसच्या उपचाराने खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे याही व्याधी-लक्षणे नियंत्रणात आल्याचे निदर्शनास आले आहे. शतप्लस ट्रीटमेंट ग्रुपमध्ये स्टँडर्ड ट्रिटमेंट ग्रुपच्या तुलनेत रोग प्रतिकारक शक्ती सुचकांवर अर्थात इम्युनिटीइंडीकेटर्सवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. शतप्लस हे वैद्यकीय दृष्ट्या वैध आयुर्वेदिक औषध असून विषाणूजन्य संक्रमणापासून ते संरक्षण करते आणि लढायला मदत करते. सहाय्यक उपचार म्हणून संसर्गजन्य रोगापासून बचाव आणि संरक्षणात शतप्लस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 
जागतिक समुदायाला आणि मानव जातीच्या सेवेसाठी दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याचे बीव्हीजीचे ध्येय आहे. पारंपारिक आणि सिद्ध पारंपारिक आयुर्वेदिक औषधीय ज्ञान प्रणालीवर आधारित आरोग्य व सेवा यांच्याविषयी शोध घेण्यावर आणि औषधी विकसीत करण्यावर भर दिला आहे.