कोंढवा प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जनसेवक राजेंद्र भिंताडे आणि भाजपाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी दादा कड, ओंकार होले, अविनाश टकले, आबा घुले, नाना घुले, काशिनाथ भिंताडे, श्रीकांत भिंताडे, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे, अक्षय टकले , लालचंद भिंताडे व उंड्री ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानावी या उदात्त विचारांनी त्यांनी आपल्या प्रजेवर राज्य करत राज्याचा व प्रजेचा विकास केला. त्यांच्या कार्यकाळातील प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व, न्याय, स्वातंत्र्य या मानवी मूल्यांवर अहिल्याबाईंनी काम केल्याचे पाहायला मिळाले . त्यामुळे समाजातील सर्व नागरिकांनी अहिल्याबाईंचे आचार, विचार आमलात आणावे, त्याचवेळी आपल्या देशात मोठी प्रगती झालेली पहायला मिळेल असे प्रतिपादन राजेंद्र भिंताडे यांनी जयंती निमित्त उपस्थित मान्यवरांना केले. तसेच अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त समाजातील नागरिकांना अन्नदान करण्यात आले .