Friday, March 21, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपुणे डॉक्टर्स असोशिएशन आणि ब्रम्हमुहूर्त केंद्राच्या वतीने योग दिन उत्सहात साजरा

पुणे डॉक्टर्स असोशिएशन आणि ब्रम्हमुहूर्त केंद्राच्या वतीने योग दिन उत्सहात साजरा

अनिल चौधरी,पुणे
आंतरराष्ट्रीय योगदानाचे औचित्य साधून पुणे डाॅक्टर असोसिएशन व ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने योगगुरु श्री.दीपक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन  अतिशय उत्साहात आणि जल्लोषात यश लाॅन्स ,बिबवेवाडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरु श्री.दीपक महाराज यांनी डॉक्टर्स व साधक यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, वैचारिक पातळीवर परस्परांना पूरक नसलेल्या पण एकमेकांसाठी विरोधाभास असलेल्या या दोन शक्तीदेवता,जीवरक्षक म्हणजेच हे एकाच मंचावर पाहणे हे नवलंच.कारण एक शक्ती विज्ञानाच्या आधारावर औषधोपचार करून आपल्या रोग्याला, पिडीताला वाचवते,तर दुसरी शक्ती औषधोपचार बाजूला ठेवून योगमार्ग आणि आध्यात्माद्वारे पिडीताचं रक्षण करून त्यांना आनंदी जीवन जगण्याची कला बहाल करते. एकीकडे उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च तर दुसरीकडे , फक्त तुमची आत्मशक्ती,तुमचा आत्मविश्वास, आणि तुमचा योगासाठीचा वेळ.बसं एवढंच पुरेसे आहे. योगाने आपण आपली शाररिक क्षमता वाढवून आंनदी जीवन जगू शकतो असेही गुरुदेव यावेळी म्हणाले.

  याप्रसंगी बोलताना जेष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश बडवे म्हणाले कि, भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असेही ते यावेळी म्हणाले.  
*योगाभ्यासाच्या क्षमतेबाबत बोलतांना जनसेवक राजेंद्र भिंताडे म्हणाले की, लोकांना तसेच समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर योगाभ्यास हे उत्तर आहे. योगाभ्यासामुळे ताणतणाव विरहीत शांत आणि समाधानी जीवन जगता येऊ शकेल. भेदभाव न करता योगाभ्यास सर्वांना एकत्र आणतो, वैरभावाच्या जागी एकजुटीची भावना निर्माण करतो. वेदना वाढण्याऐवजी योगामुळे आराम मिळतो.योगाभ्यास हे अतिशय सुंदर आहे कारण ते प्राचीन आहे आणि तरीही आधुनिक आहे, यात आपल्या वर्तमान आणि भूतकाळाचा समतोल असून, आपल्या भविष्यासाठी आशेचा किरण मिळतो. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन देखील राजेंद्र भिंताडे यांनी नागरिकांना केले आहे.*
  याप्रसंगी पीडीए चे अध्यक्ष डॉ.संभाजी मांगडे, डॉ.सचिन केदार, डॉ. रवींद्रकुमार काटकर, डॉ. मेघना कारंडे, डॉ. स्वप्नाली वाडेकर, सचिन लकडे, वैशाली शिळीमकर,शशिकांत आनंददास,सुधीर गरूड , रवींद्र औटी, पायगुडेसर, अश्विनी पासलकर, प्रतिभा मोरे, आरती कदम, राजेंद्र भिंताडे, संतोष गोरड आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!