Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीमहिलांसाठी “सौ भाग्यवती” हा खेळ मनोरंजन व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम मोदी गणपती...

महिलांसाठी “सौ भाग्यवती” हा खेळ मनोरंजन व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम मोदी गणपती येथे संपन्न

पुणे प्रतिनिधी,

भरत मित्र मंडळ महाशिवरात्र उत्सव समिती व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी “सौ भाग्यवती” हा खेळ मनोरंजन व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम मोदी गणपती नारायण पेठ येथे संपन्न झाला. यात महिलां साठी गाणे ओळखा,दोरीच्या उड्या,संगीत खुर्ची आदी तसेच अन्य कार्यक्रम यात होते. या कार्यक्रम प्रसंगी आयोजक निरंजन दाभेकर,सौ.तेजस्विनी निरंजन दाभेकर,बाळासाहेब दाभेकर,व कार्यक्रम सादर करणारे सुप्रसिद्ध कलाकार संदीप पाटील आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. संदीप पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीने सर्व कार्यक्रम खेळीमेळीने व उत्साहाने सादर केला. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे त्यातील सर्व महिलांना,साडी,व भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. कायम व्यस्त असणार्‍या महिला वर्गाला घटकभर तणावमुक्त व आनंदित करावे या साठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे निरंजन दाभेकर यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!