आषाढी एकादशी निमित्ताने “भजनरंग”

783

सागर बोधगिरे, पुणे 

संत दर्शन मंडळ व सर्वोत्कर्ष पब्लिक ट्रस्ट आयोजित “भजनरंग” हा कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्ताने भजन, भक्तीगीत,अभंग आणि कीर्तन यांचा विठ्ठल भक्तिमय कार्यक्रम 11 जुलै 2019 सायं 5:30 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह ,पद्मावती, पुणे येथे विनामूल्य होणार आहे.
या कार्यक्रमात चारुदत्त आफळे यांचे निरूपण आणि कीर्तन होणार असून सावनी दातार व राजेश दातार यांचे भक्तीगीत होणार आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे पुणेकरांनी जास्तीत जास्त याचा आस्वाद घ्यावा व कार्यक्रमाचे पासेस दोन दिवस आधी सभागृहात उपलब्ध असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत राजेश दातार यांनी दिली.
संत दर्शन मंडळ व सवोत्कर्ष पब्लिक ट्रस्ट नेहमी विविध सामाजिक कार्य करत असते.तसेच हे संस्थेचे 10 वे वर्षे आहे.संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे असे कार्यक्रम करण्यात येतात.
या कार्यक्रमात वादक मिलिंद गुणे,रमाकांत परांजपे, राजेंद्र दुरकर, पद्माकर गुजर,नितीन जाधव,राजेंद्र साळुंखे, आणि अमर ओक हे असणार आहेत.