जागतिक वनदिनानिमित्त वृक्ष लागवडीचे राजेंद्र भिंताडे यांचे आवाहन

634

अनिल चौधरी, पुणे

२१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येत असून आपल्या राज्यात ३३ टक्के क्षेत्र वनाखाली आणण्यासाठी एक मूल व एक झाड हि संकल्पना राबविणे गरजेचे आहे असे आवाहन प्रसिद्ध युवा उद्योजक राजेंद्र भिंताडे यांनी पुण्यातील उंड्री परिसरात १०० झाडाचे वृक्षारोपण करताना व्यक्त केले आहे.

शहरात वाढत्या आधुनिकरणासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या इमारती उभ्या होत आहेत , त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड होत आहे. याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील जल स्रोत कमी होत आहे तसेच वाढत्या अतिप्रदूषणामुळे ओझोन थर कमी होत असून त्याचा पृथीवर परिणाम होत आहे.. वृक्षांचे प्रमाण कमी झाल्यामुळे साहजकीच उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन जास्तीत जास्त झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. यामूळेच आम्ही उंड्री परीसरात आज १०० झाडे लावून जागतिक वनदिन उत्सहात साजरा केला. लोकांनी आप-आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्याची निगा राखली पाहिजे व ते झाड जगवीले पाहिजे असेही भिंताडे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी राजेंद्र भिंताडे, मुस्तफा, लालचंद भिंताडे, विश्वास भिंताडे, महेश होले,  दीपाली भिंताडे, यश भिंताडे, तनया भिंताडे, श्रीतेज भिंताडे, जानवी भिताडे, श्रीहर्ष भिंताडे, त्रिशा भिंताडे, श्रावि भिताडे आदी उपस्थित होते.